Home > News Update > शाळकरी मुलांनी केला खुन; शाळेतील भांडणातून एकाच्या छातीत खुपसला सुरा

शाळकरी मुलांनी केला खुन; शाळेतील भांडणातून एकाच्या छातीत खुपसला सुरा

शाळकरी मुलांनी केला खुन; शाळेतील भांडणातून एकाच्या छातीत खुपसला सुरा
X

दहावीत शिकणाऱ्या दोन तुकड्यांमधील झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरातील शाळेतून समोर आली आहे. या घटनेत 15-16 वर्षांच्या मुलांनी त्यांच्यात वयाच्या विद्यार्थ्याची हत्या केली.ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये शाळेत हत्येचा थरार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दहावीचे अत्यंत महत्वाचे वर्ष व त्यात कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थी अस्वस्थ झाले होते. आता शाळा उघडली व सहामाही परीक्षा सुरु असल्याने सर्वच शाळेतील विद्यार्थी जोमाने अभ्यासाला लागले आहेत. काही मुले मात्र भलत्याच कृत्यात अडकली आहेत. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात असलेल्या शाहू महाराज विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणाऱ्या दोन तुकड्यांमधील विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. शाळेजवळील प्रगती रुग्णालय येथील पाईपलाईन ब्रिजवर हा प्रकार घडला. ज्यात तीन विद्यार्थ्यांनी पंधरा वर्षीय तुषार गोरख साबळे या विद्यार्थ्याच्या छातीत सुरा खुपसून निर्घृण हत्या केली. तुषार वर झालेला वार इतका जोरदार होता की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान याप्रकरणी तीन आरोपी विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थी अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर उचित कारवाई केली जाईल, असे पोलिस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

Updated : 27 Oct 2021 1:57 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top