Home > News Update > ठाण्यात मनोरुग्णालया बाहेर संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन...

ठाण्यात मनोरुग्णालया बाहेर संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन...

ठाण्यात मनोरुग्णालया बाहेर संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन...
X

राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना, दुसरीकडे ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा तोंडाचा पट्टा दररोज सुरुच आहे. यावर शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाण्याच्या मनोरुग्णालयात संजय राऊत यांच्यावर उपचार करण्यासाठी एक बेड मोकळा ठेवण्यात यावा अशी मागणी करत आंदोलन करण्यात आले.

शिवसेना महिला आघाडीच्यावतीने प्रतिकात्मक संजय राऊत यांना ठाण्यातील मनोरुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न आज करण्यात आला. मात्र पोलिसांनी रुग्णालयात रुग्णवाहिका नेण्यास मनाई केली. शिवसेना महिला आघाडीच्या वतीने यावेळी रुग्णालयात संजय राऊत यांचे दाखल पत्र रुग्णालयातील अधीक्षकांना देण्यात आले, तसेच संजय राऊत यांच्या करिता या रुग्णालयात बेड ही बुक करण्यात आला. यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका नम्रता भोसले, मालती पाटील, यांच्यासह सर्व पदाधिकारी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात आल्या होत्या.

सध्या संजय राऊत यांची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करत असून, यासंदर्भात ठाणे महिला आघाडीच्यावतीने ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयात संजय राऊत यांच्या करिता बेड बुक करण्यात आला. यावेळी मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात ते आमचे पूर्वीचे नेते असून त्यांच्या संदर्भात आपुलकीची भावना व्यक्त करत आम्ही हा निर्णय घेत असल्याचेही माध्यमांसमोर सांगितले.

Updated : 23 Feb 2023 12:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top