Home > News Update > THANE | भिवंडीतील युवांसाठी वाशी परिवार फाऊंडेशन - डीबीएम इंडिया द्वारे कौशल्य विकास केंद्राची सुरूवात

THANE | भिवंडीतील युवांसाठी वाशी परिवार फाऊंडेशन - डीबीएम इंडिया द्वारे कौशल्य विकास केंद्राची सुरूवात

THANE | भिवंडीतील युवांसाठी वाशी परिवार फाऊंडेशन - डीबीएम इंडिया द्वारे कौशल्य विकास केंद्राची सुरूवात
X

भिवंडी इथल्या दापोडे येथे स्थानिक युवांसाठी वाशी परिवार फाऊंडेशन आणि डिबीम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे. भिंवडी सारख्या ग्रामीण भागातील तरूणांना रोजगार मिळावा, त्यांना उत्तम प्रशिक्षण मिळावं या करिता वाशी परिवार फाऊंडेशन आणि डिबीम इंडिया द्वारे कौशल्य विकासाचा उपक्रम राबवण्यात आला आहे.

या उपक्रमाच्या पहिल्या बॅच मध्ये 25 तरूणांचा समावेश असणार आहे. यामध्ये मुलांना तीन महिने विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कौशल्य विकासाच्या प्रशिक्षणानतंर प्रशिक्षणार्थी युवांना रोजगारही उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे नवस्तुती इंटरनॅशनल ट्रस्ट डीबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय विश्वस्त परमजीत सिंग यांनी सांगितले


या कौशल्य विकास केंद्राद्वारे वेअर हाऊस मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे तसेच त्यांना या कार्यशाळेत संगणकीय प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, व्यवसाय व्यवस्थापन अशा विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी इन्टिग्रेटेड सोल्यूशनचे सीईओ मदन मदन दोडेजा यांनी दिली.

भिवंडी ग्रामीण आणि शहरातील रोजगाराची गरज ओळखून वाशी परिवार फाऊंडेशन आणि डिबीम इंडिया यांनी कौशल्य विकास केंद्राची सुरूवात केली आहे, असे भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

Updated : 8 Oct 2023 6:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top