Home > News Update > ठाकरे सरकारने कॉपी केली मोदी सरकारची बुलडोजर निती, आपच्या प्रिती शर्मा यांची टीका

ठाकरे सरकारने कॉपी केली मोदी सरकारची बुलडोजर निती, आपच्या प्रिती शर्मा यांची टीका

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत बुलडोजर पॉलिटिक्सची चर्चा रंगली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारही मोदी सरकारची कॉपी करत बुलडोजर पॉलिटिक्स करत असल्याचा आरोप आपच्या प्रिती शर्मा यांनी केला आहे.

ठाकरे सरकारने कॉपी केली मोदी सरकारची बुलडोजर निती, आपच्या प्रिती शर्मा यांची टीका
X

दिल्लीसह मध्यप्रदेशात करण्यात येत असलेल्या बुलडोजर कारवाईवरून सध्या देशात राजकारण रंगले आहे. त्यातच जहांगिरपुरा भागात दिल्ली महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर सर्वोच्च न्यायालयाने या कारवाईला स्थगिती दिली. त्यापार्श्वभुमीवर मध्यप्रदेशातही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली आहे. मात्र मोदी सरकारची कॉपी करत महाराष्ट्रातही बुलडोजर पॉलिटिक्स सुरू असल्याची टीका आपच्या प्रीती शर्मा यांनी केली.

मुंबई विमानतळाच्या जवळ असलेल्या वाल्मिकी नगर येथील 90 मेट्रो पीएमपी कुटूंबांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊनही सरकारने शब्द पाळला नाही. मात्र ते आश्वासन न पाळता त्या कुटूंबांच्या घरांवर बुलडोजर चालवण्यात येणार आहे. या पथकाच्या अधिकारी असलेल्या रचना इंदुरकर या संवेदनाहिन अधिकारी आहेत. त्या हे बुलडोजर पथकाचे नेतृत्व करीत आहेत, असे आपच्या प्रीती शर्मा यांनी म्हटले आहे.

दिल्ली, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रातही अशा प्रकारे कारवाई करण्यात येत असल्याने ठाकरे सरकारने मोदी सरकारची बुलडोजर निती कॉपी केल्याचा आरोप आपच्या प्रीती शर्मा यांनी केला आहे. त्यासंदर्भात प्रीती शर्मा यांनी ट्वीट केले आहे.


Updated : 20 May 2022 4:01 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top