Home > News Update > वॉट्सअपला टाटा, टेलिग्रामची चलती.....वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींवर

वॉट्सअपला टाटा, टेलिग्रामची चलती.....वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींवर

वॉट्सच्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीला वापरकर्त्यांना नको म्हणत वॉट्सअपला धडा शिकवला आहे. त्यामुळे इतर मेसेजिंग एपची चलती वाढली आहे.

वॉट्सअपला टाटा, टेलिग्रामची चलती.....वापरकर्त्यांची संख्या ५० कोटींवर
X

Whatsappने आपल्या वापरकर्त्यांच्या माहितीचा वापर फेसबुक आणि इतर व्यासपीठांसाठी करण्याचा निर्णय घेत आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये बदल केला आहे. पण वापरकर्त्यांना हा निर्णय पटला नसल्याने इतर मेसेजिंग एप वापरण्याकडे वापरकर्त्यांचा कल वाढू लागला आहे. यात वापरकर्त्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे ती Telegramme एपला...गेल्या ७२ तासात सुमारे अडीच कोटी लोकांनी टेलिग्राम एप डाऊनलोड केल्याची माहिती टेलिग्रामने दिली आहे.

त्यामुळे आता टेलिग्राम वापरणाऱ्यांची संख्या जगभरात तब्बल ५० कोटींच्यावर गेली आहे. वॉट्सअपने आपल्या वापरकर्त्यांची माहिती इतर व्यावसायिक वापरासाठी फेसबुकला देण्याची अट घातली होती तसेच ही अट मान्य नसलेल्यांना वॉट्अपचा वापर करता येणार नाही असे सांगितल होते. त्यामुळे जगभरातून वॉट्सअपच्या या धोरणाला विरोध झाला. अनेकांनी वॉट्सअप बंद करत इतर मेसेजिंग एप वापरण्याचा निर्णय घेतल्यानंतर वॉट्सअपने नातेवाईक आणि इतरांची माहिती गुप्त राहिल असे स्पष्टीकरण दिले. पण यानंतरही वॉट्सअप वापरणाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे.

Updated : 14 Jan 2021 8:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top