Home > News Update > पुन्हा ऑनर किलिंग, राखी पौर्णिमेला जीवदान मागणाऱ्या बहिणीची भावाने केली हत्या

पुन्हा ऑनर किलिंग, राखी पौर्णिमेला जीवदान मागणाऱ्या बहिणीची भावाने केली हत्या

परजातीतील मुलावर प्रेम केल्याने अल्पवयीन भावाने केली बहिण आणि प्रियकराची हत्या

पुन्हा ऑनर किलिंग, राखी पौर्णिमेला जीवदान मागणाऱ्या बहिणीची भावाने केली हत्या
X

जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना शहरातील चोपडा भागात घडली. राखीपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीच एका अल्पवयीन भावाने आपल्या बहिणीची आणि तिच्या प्रियकराची निर्दयी हत्या केली. यामुळे संपुर्ण शहरात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.


जळगावात सुंदरगढी येथे राहणारी वर्षा समाधान कोळी(वय २०) आणि रामपूर येथे राहणारा राकेश संजय राजपूत (वय, २२) या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. त्यांच्या या प्रेमसंबंधांविषयी मयत मुलीच्या भावाला कळालं. वर्षाचा भाऊ हा अल्पवयीन आहे. रक्षाबंधनाच्याच दिवशी आम्हाला मारू नको अशी विनवणी वर्षाने आपल्या भावाला केली, परंतू आरोपी मुलाने कसलाही विचार न करता आपल्या बहिणीच्या प्रियकराला सोबत आणलेल्या गावठी पिस्तूलातून गोळ्या घालून त्याची हत्या केली तर बहिणीचा गळा दाबून तिचादेखील खुन केला. यानंतर तो हातात पिस्तूल घेऊन आरोपी मुलगा स्वतःच पोलिस ठाण्यात हजर झाला आणि केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना चोपडालगत जुना वराड रोड शिवारात पाहणी केली असता नाल्यात या प्रेमी युगूलाचे मृतदेह आढळून आले.


हा हत्येचा प्रकार रात्रीच्या सुमारास घडला आणि साडे दहाच्या आसपास अल्पवयीन मुलगा पिस्टल घेऊन पोलिसात हजर झाला आणि आपण दोघांचा खून केल्याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं आले आहे. तर दोघांचा शोध चोपडा पोलिस अद्यापही करत आहेत.

Updated : 13 Aug 2022 1:14 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top