Home > News Update > 'मौका-मौका' या जाहिरातीच्या माध्यमातून पाकिस्तान संघाला डिवचले; व्हिडिओ व्हायरल

'मौका-मौका' या जाहिरातीच्या माध्यमातून पाकिस्तान संघाला डिवचले; व्हिडिओ व्हायरल

मौका-मौका या जाहिरातीच्या माध्यमातून पाकिस्तान संघाला डिवचले; व्हिडिओ व्हायरल
X

टी-२०चा सुपर-१२ टप्पा सुरू झाला आहे. आता क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत - पाकिस्तान सामन्याकडे. या सामन्यासाठी काही क्रीडाप्रेमी विशेष तयारी करून बसले आहेत. दरम्यान, मौका-मौका या प्रसिदध जाहिरातीचा एक नवीन व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात 'झिरो' चा उल्लेख करताना पाकिस्तानला टोपणा लगावण्यात आला आहे.स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर हँडलवरून शनिवारी मौका-मौका जाहिरातीचा एक नवा व्हिडिओ शेअर करण्यात आला.

यात एक मुलगा मोहसीन दुबईतील शाळेत शिकत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दरम्यान, लायब्ररीतली एक मुलगी म्हणते, हा झिरो करणारा कोणता हिरो असेल. तेव्हाच मोहसीनचा मित्र त्याला सांगतो, ते तुझ्या वडिलांबद्दल बोलत आहेत.

मोहसीनचे वडील तोच अभिनेता असतो, जो मौका-मौका जाहिरातीत पाकिस्तानला पाठिंबा देताना दिसतो. 'शून्याचा शोध भारताने नक्कीच लावला, पण प्रत्येक प्रसंगी त्याचा वापर करणारा तर..', असे कॅप्शन व्हिडिओला देण्यात आले आहे. खरतर, पाकिस्तान संघाला या व्हिडिओद्वारे डिवचण्यात आले आहे. कारण पाकिस्तान वर्ल्डकपमध्ये भारताला कधीही पराभूत करू शकलेला नाही.

दरम्यान भारत-पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्यासाठी पाकिस्तानने १२ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाची कमान बाबर आझमच्या हाती आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे

Updated : 24 Oct 2021 1:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top