Home > News Update > श्रेयस आणि सिराजच्या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

श्रेयस आणि सिराजच्या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

भारतीय संघाने सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीमच्या सदस्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सध्या जोहान्सबर्गमध्ये आहे. येथील एका हॉटेलामध्ये सर्वांनी एकत्र येत नव्या वर्षाचे जल्लोषात केले

श्रेयस आणि सिराजच्या डान्स व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
X

मुंबई // भारतीय संघाने सेंच्युरियन टेस्ट जिंकल्यानंतर टीमच्या सदस्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. टीम इंडिया सध्या जोहान्सबर्गमध्ये आहे. येथील एका हॉटेलामध्ये सर्वांनी एकत्र येत नव्या वर्षाचे जल्लोषात केले आहे. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. हेड कोच राहुल द्रविड , विराट कोहलीसह सर्व सदस्य या पार्टीत सहभागी झाले होते. दरम्यान टीम इंडियाचा बॅटर श्रेयस अय्यरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि मोहम्मद सिराज हॉटेल स्टाफसोबत डान्स करताना दिसत आहे.

श्रेयस आणि सिराजच्या या डान्स व्हिडीओची चांगलीच चर्चा होत आहे. पहिल्या टेस्टमध्ये श्रेयसला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली नव्हती. श्रेयसनं न्यूझीलंड विरुद्धच्या सीरिजमध्ये पदार्पणातील टेस्टमध्ये शतक झळकावले होते.

Updated : 2 Jan 2022 3:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top