Home > News Update > IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाचा ३-० ने मालिकाविजय

IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियाचा ३-० ने मालिकाविजय

IND vs NZ 3rd T20 :  टीम इंडियाचा ३-० ने मालिकाविजय
X

कोलकाता : कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ७३ धावांनी विजय मिळवला. यासह भारताचा नवा कर्णधार रोहित शर्मा आणि नवा हेड कोच राहुल द्रविड यांनी पहिली मोहीम फत्ते केली आणि तीन सामन्यांच्या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले. रोहितने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.रोहितने आपला खेळ पुन्हा बहरत मालिकेतील सलग दुसरे अर्धशतक ठोकले. रोहितच्या ५६ धावा आणि शेवटी दीपक चहरने केलेल्या फटकेबाजीने भारताने २० षटकात ७ बाद १८४ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे फलंदाज १७.२ षटकात १११ धावांवरच ढेपाळले. फिरकीपटू अक्षर पटेलने सर्वाधिक ९ धावांत ३ बळी घेतले. तर हर्षलला २ बळी घेतले.

कोलकात्यात दवाचा परिणाम होईल, असे वाटत असताना भारताने गोलंदाजीत दमदार सुरुवात केली. आणि न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन आणि ग्लेन फिलिप्स यांना पॉवरप्लेमध्ये बाद केले. सलामीवीर मार्टिन गप्टिलने अर्धशतक ठोकले. त्याने ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५१ धावा केल्या.मात्र, यजुर्वेंद्र चहलने ११व्या षटकात त्याला माघारी पाठवले.

Updated : 22 Nov 2021 3:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top