Home > News Update > संतापजनक ! शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून मुस्लिम मुलाला केली मारहाण

संतापजनक ! शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून मुस्लिम मुलाला केली मारहाण

संतापजनक ! शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून मुस्लिम मुलाला केली मारहाण
X

गेल्या काही वर्षात देशातील धार्मिक द्वेष वाढत असतानाच शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून मुस्लिम मुलाला मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

देशात धार्मिक द्वेषाचे प्रकार वाढत असतानाच उत्तर प्रदेशातील मुजफ्परनगर जिल्ह्यातील खुब्बापुर गावातील नेहा पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिकेने युकेजीच्या मुस्लिम विद्यार्थ्याला वर्गातील इतर विद्यार्थ्यांकडून चापट लगावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला.

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमधील खुब्बापुर गावातील नेहा पब्लिक स्कूल या शाळेतील त्रिप्ता त्यागी नावाच्या शिक्षिकेने युकेजीच्या मुस्लिम विद्यार्थ्याला पाचचा पाढा म्हणायला सांगितला होता. त्यावेळी त्या विद्यार्थ्याला पाचचा पाढा न आल्याने शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांना मुस्लिम विद्यार्थ्याच्या कानशिलात मारण्यास सांगितल्या. त्यानंतर वर्गातील एकेक विद्यार्थी उठून मुस्लिम विद्यार्थ्याला मारहाण करत होते. त्यावेळी शिक्षिका पुन्हा कानशिलात मारून गेलेल्या विद्यार्थ्याला आणखी जोरात दोन्ही कानशिलात मारायला सांगत असल्याचे तालिबानी दृष्य रेकॉर्ड केलेले समोर आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट उसळली आहे. मात्र या प्रकारातून शिक्षिकेचा मुस्लिम द्वेष समोर आला आहे. त्यामुळे या शिक्षिकेला अटक करण्याची मागणी येत आहे.



Updated : 26 Aug 2023 6:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top