Home > News Update > Income Tax Slab स्लॅबमध्ये कोणताही बदल न झाल्याने करदात्यांचा अपेक्षाभंग

Income Tax Slab स्लॅबमध्ये कोणताही बदल न झाल्याने करदात्यांचा अपेक्षाभंग

Income Tax Slab स्लॅबमध्ये कोणताही बदल न झाल्याने करदात्यांचा अपेक्षाभंग
X

Incoem Tax Slab : आज सहावा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पुष्कळ मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कसलाही बदल केलेला नाही. त्यामुळे कर देय्यकरांना कोणताही दिलासा या बजेटच्या माध्यमातून मिळालेला नाही.

संसदेमध्ये आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्थसंकल्प मांडेल. त्यावेळी टॅक्स स्लॅबबाबतीत अजून काही नव्या मोठ्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञ आणि जानकारांनी व्यक्त केला आहे.

दरवर्षीच्या अर्थसंकल्पातील प्राप्तिकरामध्ये सूट मिळेल याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या जातात, यावेळीही लोकांना कुठेतरी आशा होती. मात्र भारत सरकारकडून अंतरिम अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केला गेलेला नाही.

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनुसार, ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर आकारला जाणार नाही. पाच वर्षांत करदात्याच्या सेवांमध्ये सुधारणा झाली आहे. अंदाजानुसार, राज्याची वित्तीय तूट जीडीपीच्या ५.८ टक्के एवढी आहे, असं अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितलं.


जुना टॅक्स स्लॅब

2.5 लाखांपर्यंत 0 टक्के कर

2.5 लाख ते 5 लाखांवर 5 टक्के कर

10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर

5 लाख ते 10 लाखांवर 20 टक्के कर


नवीन टॅक्स स्लॅब

0 ते 3 लाख रुपयांवर 0 टक्के कर

3 ते 6 लाखांवर 5 टक्के कर

6 ते 9 लाखांवर 10 टक्के कर

9 ते 12 लाखांवर 15 टक्के कर

12 ते 15 लाख 20 टक्के कर

15 लाख पेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

PM kisan Yojana चा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा

१ कोटी महिलांना लखपती केलं

लखपती दीदी योजनेतून आत्मनिर्भर केलं

आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुषमान भारत योजना लागू

धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणार

आयुषमान भारत योजना सर्व आशासेविकांना लागू

पुढची पाच वर्षे विकासाची असतील

नवीन मेडिकल कॉलेज उभारणार

९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालाय

पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन

राज्यांना व्याजमुक्त कर्ज देणार

७५ हजार कोटींचे व्याजमुक्त कर्ज

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार

Updated : 1 Feb 2024 8:22 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top