Home > News Update > धावण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर, टाटा मॅरेथॉन मध्ये हजारोंचा सहभाग...

धावण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर, टाटा मॅरेथॉन मध्ये हजारोंचा सहभाग...

धावण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर,  टाटा मॅरेथॉन मध्ये हजारोंचा सहभाग...
X

मुंबईतील बहुचर्चित टाटा मॅरेथॉन स्पर्धा आज नागरिकांच्या मोठ्या उत्साहात पार पडली. दोन वर्षानंतर मुंबईत या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मॅरेथॉन मध्ये जवळपास 55 हजार मुंबईकरांनी आज सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मुंबईच्या माहीम या भागापासून सुरू झाली. 21 किलोमीटरच्या या हाफ मॅरेथॉनला भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉन साठी मुंबईतील अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच विशेष लोकल ट्रेनची सुविधा सुद्धा करण्यात आली होती. या मॅरेथॉन मध्ये भाग घेण्यासाठी कल्याण, डोंबिवली, ठाणे या भागातून मोठ्या संख्येने नागरिक आल्याचं पाहायला मिळालं.दोन वर्षानंतर मुंबईत टाटा मॅरेथॉनचे आयोजन..

मुंबईमध्ये दरवर्षी टाटा मॅरेथॉनला मोठा उत्साह असतो. पण मागच्या दोन वर्षापासून ही मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. कोरोनानंतर यंदा ही मॅरेथॉन अत्यंत उत्साहात पार पडल्याचे पाहायला मिळालं. टाटा समूहाने या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पहाटे 5 वाजून 15 मिनिटांनी या स्पर्धेला सुरुवात झाली. मॅरेथॉनला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी वाहतुकीत सुद्धा काही बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी बदलण्यात आली होती. यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले होते.Updated : 15 Jan 2023 8:03 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top