Home > Economy > Tata Car Discount : ग्राहकांनो, हीच ती संधी! Honda, Tata, Skoda वर मिळत आहे बंपर डिस्काउंट

Tata Car Discount : ग्राहकांनो, हीच ती संधी! Honda, Tata, Skoda वर मिळत आहे बंपर डिस्काउंट

Tata Car Discount  : ग्राहकांनो, हीच ती संधी! Honda, Tata, Skoda वर मिळत आहे बंपर डिस्काउंट
X

Tata Car Discount : आज भारतीय ऑटो बाजारात तुम्हाला कमी किमतीमध्ये एकापेक्षा एक मस्त मस्त कार्स पाहायला मिळतात. या कार्समध्ये तुम्हाला दमदार इंजिन आणि भन्नाट भन्नाट फीचर्स देखील कंपनीकडून ऑफर करण्यात येत आहे.

यातच जर तुम्ही ऑक्टोबर 2023 मध्ये नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे जाणून घ्या कि या महिन्यात भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जबरदस्त डिस्काउंट ऑफर देत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही परवडणाऱ्या किमतीमध्ये नवीन कार घरी आणू शकता. चला या लेखात जाणून घेऊया तुम्ही ऑक्टोबर 2023 मध्ये कोणत्या नवीन कार्सवर किती डिस्काउंट प्राप्त करू शकता.

Skoda Kushaq, Slavia आणि Kodiaq ऑफर

ऑक्टोबर 2023 मध्ये तुम्ही जर Skoda Kushaq, Slavia किंवा Kodiaq कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. हे जाणून घ्या कि या महिन्यात कंपनी Kushaq SUV वर 1.5 लाख रुपयांपर्यंतचे फायदे देत आहे. तर मिड साइज सेडान स्लाव्हियावर तुम्हाला 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर बाजारात पॉवरफुल एसयूव्ही म्हणून ओळखली जाणारी Skoda Kodiaq वर कंपनी तुम्हाला 65 हजार रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे.

Volkswagen Virtus आणि Taigun ऑफर

ऑटो बाजारात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी कंपनी Volkswagen देखील ग्राहकांना या महिन्यात बंपर सूट देत आहे. तुम्हाला या महिन्यात कंपनीची लोकप्रिय कार Taigun वर 1 लाख रुपयांपर्यंतचा डिस्कॉऊंट मिळणार आहे. तर Virtus सेडान कारवर तुम्हाला 1 लाख रुपयांपर्यंतचे फायदे तसेच रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि लॉयल्टी बोनस मिळणार आहे.

Renault ऑफर

ऑक्टोबर 2023 मध्ये Renault देखील ग्राहकांना मस्त मस्त ऑफर देत आहे. तुम्ही या ऑफर अंतर्गत Renault Kwid आणि Renault Triber वर 50 हजारांची सूट प्राप्त करू शकता. तर Renault Kiger वर तुम्हाला 65 हजार रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

Honda City आणि Amaze ऑफर

Honda देखील या महिन्यात ग्राहकांना भन्नाट ऑफर देत आहे. या ऑफरमध्ये होंडा ग्राहकांना लोकप्रिय कार Honda City वर तब्बल 75 हजार रुपयांचा डिस्काउंट देत आहे तर Honda Amaze या सेडान कारवर 57 हजार रुपयांपर्यंतची सूट देत आहे.

Tata Motors ऑफर

भारतीय ऑटो बाजारात मारुती सुझुकीला टक्कर देणारी टाटा मोटर्स देखील ग्राहकांना ऑक्टोबर महिन्यात जबरदस्त डिस्काउंट देत आहे. या महिन्यात Tiago CNG आणि Tigor CNG वर वर तुम्हाला 40 हजार रुपये तर Tata Altroz च्या मॅन्युअल व्हेरियंटवर 30 हजार आणि DCA व्हेरियंटवर 25 हजारांची सूट मिळत आहे.Updated : 20 Oct 2023 8:28 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top