Home > News Update > चिन्मय ला सोबत तन्मय आला, देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल

चिन्मय ला सोबत तन्मय आला, देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल

चिन्मय ला सोबत तन्मय आला, देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रोल
X

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पुतण्याने कोरोना लसीचे डोस घेतल्यानं सध्या फडणवीसांवर चांगलीच टीका केली जात आहे.

फडणवीस यांचा पुतण्या 25 वर्षाचा आहे. दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षापुढील लोकांना लस दिली जाते. मात्र, फडणवीस यांच्या पुतण्याला वयाच्या 25 व्या वर्षी लस देण्यात आली आहे. त्यावर सोशल मीडियावर मोठं वादळ उठलं आहे.

सध्या सोशल मीडियावर #tanmayfadnavis हा ट्रेन्ड सुरु करण्यात आला आहे.

सुर्यकांत शिंदे नामक एका व्यक्तीने एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये चिन्मय ला सोबत तन्मय आला असं म्हणत सोशल मीडियावर फडणवीसांना ट्रोल करण्यात आलं आहे.

प्रिन्स या अकाउंटवरुन मिर्झापूर वेब सिरिजमधल्या डायलॉगचा वापर करुन फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

माणस दिंडे या अकांउटवरुन फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना भावड्याने वशिला लावून लस घेतली असं म्हटलं आहे.

अरविंद या अकाउंटवरुन चाचा विधायक है हमरे असं म्हणत फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

प्राध्यापक शिल्पा बोडके यांनी ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये म्हणतात...

एकीकडे एक जण आपले वय 45 नाही म्हणून दु:ख व्यक्त करत होते..... दुसरीकडे 25 वर्ष वय असलेल्या तन्मय फडणवीस याने लसीचा दुसरा डोस घेऊन मोकळा झाला...

हे बरोबर नाही.......Thinking face

गोल्या या अकाउंटवरून एक ट्वीट केलं असून या ट्विटमध्ये नुसतं नाव 'तन्मय' असून चालत नाही, आडनाव 'फडणवीस' असावं लागतं असं म्हटलं आहे.

अडाणी अंबानीजीवी या अकाउंटवरून जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटला रिप्लाय करताना चोर मचाये शोर असा एक फोटो ट्वीट करण्यात आला आहे.

Updated : 20 April 2021 8:21 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top