Home > News Update > India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानाचा दारुण पराभव

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानाचा दारुण पराभव

India vs Afghanistan T20 world cup Result: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानाचा दारुण पराभव
X

T20 Cricket World Cup 2021: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) T20 World Cup च्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात दमदार विजय मिळवला. सुरुवातीला फलंदाजांनी मैदानावर जोरदार चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत 210 धावांचां डोंगर उभा केला. त्यानंतर उत्तम गोलंदाजीने अफगाणिस्तानला 144 धावांवर रोखत 66 धावांनी भारतीय संघाने विजय मिळवला.

पहिल्या दोन सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला होता. आधी पाकिस्तानने 10 आणि नंतर न्यूझीलंडने 8 विकेट्सनी मात दिल्यानंतर आज मात्र भारत आपल्या जुन्या फॉर्मात परत आलेला पाहायला मिळाला.

यावेळी रोहित - राहुल जोडीने उत्तम सलामी देत एक मोठी भागिदारी केली. ज्यानंतर शमी, आश्विन, बुमराह यांच्या गोलंदाजीच्या जोरावर अफगाणिस्तानला कमी धावसंख्येत रोखण्यात यश आहे. या विजयामुळे सर्वच देशवासीयांनी आनंद व्यक्त केला.

सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा भारतीय सलामीवीरांनी चूकीचा ठरवत जोरदार फलंदाजी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा जोडीने तब्बल 140 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित नंतर राहुल देखील बाद झाला. रोहितने 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार ठोकत 74 धावा केल्या. तर राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 69 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या पंत आणि पंड्या यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पंड्याने नाबाद 35 आणि पंतने नाबाद 27 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 210 धावा ठोकल्या.

211 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातच अत्यंत खराब झाली. पहिली सर्व फलंदाजाची फळी पटपट बाद होत गेली. पण कर्णधार मोहम्मद नबी आणि करीम जनत यांनी एक चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नबीने 35 धावा केल्या. तर जनत याने नाबाद 42 धावा केल्या. मात्र, भारताचं 211 धावांचं लक्ष्य अफगाणिस्तान गाठू शकलं नाही. ज्यामुळे भारताचा 66 धावांनी विजय झाला.

Updated : 4 Nov 2021 12:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top