Home > News Update > स्वराज्य ध्वज यात्रा अयोध्येमध्ये दाखल

स्वराज्य ध्वज यात्रा अयोध्येमध्ये दाखल

स्वराज्य ध्वज यात्रा अयोध्येमध्ये दाखल
X

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली स्वराज्य ध्वज यात्रा मंगळवारी अयोध्येमध्ये पोहोचली. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते. प्रसिद्ध अशा काशी विश्वनाथ मंदिरातही ही स्वराज्यध्वज यात्रा पोहोचली. इथे स्वराज्य ध्वजाचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून प्रवास करणारी ही यात्रा इतर राज्यांमधूनही जात आहे. बिहारमधून याची सुरूवात झाली. बिहारमधील प्रसिद्ध महाबोधी मंदिरात ही स्वराज्य यात्रा सोमवारी पोहोचली होती.




काय आहे स्वराज्य ध्वज संकल्पना?

देशातील सगळ्यात उंच ध्वज हा महाराष्ट्रात उभा राहणार आहे. स्वराज्य ध्वज म्हणून हा ध्वज ओळखला जाईल, या स्वराज्य ध्वजाच्या यात्रेला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सुरूवात झाली आहे. स्वराज्यध्वज हा स्वराज्याचा, सर्व जातीधर्मांच्या लोकांचा ध्वज असून आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी या यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे, असे या यात्रेचे आयोजक रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. लोकसहभागातून परंतु कोरोना साथीशी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून ही ध्वज यात्रा ३७ दिवस सुरू राहणार आहे.




अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील गोदड महाराज मंदिरातातून गेल्या आठवड्या या यात्रेला सुरूवात झाली. १२ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्वराज्यध्वज पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्हे, भारतातील ६ राज्ये, ७४ प्रेरणास्थळे अशी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर या ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा ७४ मीटर लांबीचा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज असेल असा दावा करण्यात येतो आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच भुईकोट किल्ल्याच्या आवारात ध्वज उभारला जाणार आहे.

Updated : 22 Sep 2021 2:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top