Home > Max Political > आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी

आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी
X

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतुन अधिकृतरित्या हकालपट्टी करून त्यांचं निलंबन करण्याची घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावतीच्या हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात केली.

अमरावतीच्या हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात राजू शेट्टी यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतुन अधिकृतरित्या हकालपट्टी करून त्यांचं निलंबन करण्याची घोषणा स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अमरावतीच्या हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात केली,आमदार देवेंद्र भुयार हे शेतकरी संघटनेत सक्रिय नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. देवेंद्र भुयार यांना विजयी करण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून त्यांना विजयी केलं. मात्र शेतकऱ्यांचा विश्वासघात त्यांनी केला असा आरोप त्यांच्यावर राजू शेट्टी यांनी केला. तत्पूर्वी राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार यांच्यावर सडकून टीकाही केली. तर हिवरखेड येथील शेतकरी मेळाव्यात देवेंद्र भुयार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांची हकालपट्टीची मागणी अमरावतीतुन करण्यात येत होती. तर राजू शेट्टी यांनी त्यांच्याच पक्षाच्या एकमेव आमदारावर कारवाई केल्याने आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्यात एकही आमदार नाही.

Updated : 2022-03-25T16:04:45+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top