Home > News Update > हा तर शेतकरी एकजुटीचा विजय: स्वाभिमानी शेतकरी संघटना

हा तर शेतकरी एकजुटीचा विजय: स्वाभिमानी शेतकरी संघटना

हा तर शेतकरी एकजुटीचा विजय: स्वाभिमानी शेतकरी संघटना
X

केंद्र सरकारने वाढवलेले खतांचे दर पूर्वरत केल्यानंतर आता श्रेय वादाची लढाई सुरु झाली आहे. रयत शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी मोदींचा मास्टर स्ट्रोक म्हटल्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील रिंगणात उतरली आहे.

शेतकर्यांच्या प्रचंड विरोधानंतर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर केंद्र सरकारने रासायनिक खतांची केलेली दरवाढ मागे घेतली, हा शेतकर्यांच्या एकजुटीचा हा मोठा विजय आहे.. केंद्रसरकारला शेतकर्यांच्या विरोधामुळे आणि रेट्यापुढे अखेर झुकावे लागले आणि शेतकर्यांचं कंबरडं मोडणारा हा निर्णय सरकारला मागे घ्यावा लागला.. महाराष्ट्रातील हजारो शेतकर्यांनी पंतप्रधान कार्यालयाला मेल पाठवले.. मेल पाठवण्याचे प्रमाण इतके होते की पंतप्रधान कार्यालयाचा मेलबॉक्स फुल्ल झाला.. आणि अखेर शेतकर्यांनी मोदी सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले.. हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्यांनी दिलेल्या प्रचंड विरोधाचा व एका प्रबळ लढ्याचा विजय आहे..

सरकारने शेतकर्यांना इथुनपुढे तरी गृहीत धरून निर्णय घेणे बंद करावे अन्यथा नंतर माघार घेवुन तोंडघशी पडावे लागते, खतदारवाढीच्या आंदोलनाची माध्यमातुन महाराष्ट्रातील व देशातील सर्वसामान्य शेतकर्यांची तयार झालेल्या अभूतपूर्व वज्रमूठीने खर्या अर्थाने या व्यवस्थेविरोधात शेतकर्यांचा दबावगट निर्माण होण्यास मदत होणार आहे. असे राज्य प्रवक्ता,स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे रणजित बागल यांनी म्हटले आहे.

Updated : 20 May 2021 1:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top