Home > News Update > सरकार बहिरं झालं आहे...सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही-राजू शेट्टी

सरकार बहिरं झालं आहे...सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही-राजू शेट्टी

सरकार बहिरं झालं आहे...सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही-राजू शेट्टी
X

जागर एफआरपीचा या अभियानांतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. खा. राजू शेट्टी आज शेवगाव येथे आले असता त्यांनी त्यांनी सरकारवर जोरदार तोफ डागली. हे सरकार बहिरं झालं आहे...सरकारला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही असा घणाघात त्यांनी केला.

सोबतच ते म्हणाले की, ठाकरे साहेब तुमच्या राज्यात काय चाललंय ? कर्मचारी मुजोर झाले आहेत, त्यांच्या नाकर्तेपणामुळे व सरकारी कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळत नाही,दुसरीकडे विमा कंपन्या मात्र करोडो रुपयांचा नफा मिळवत आहेत, शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही,महाविकास आघाडी सरकारने कान बंद केले आहेत, असे सरकार आमच्या वाट्याला आले आहे, म्हणून हे जागर एफआरपीचा अभियान सुरू केले आहे, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

तुम्ही लढा उभा करा,मी तीन हजार रुपये भाव देतो,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले, यावेळी बोलताना रवीकांत तुपकर म्हणाले की,आता शेतकरी खवळला आहे, सरकारला शेतकऱ्यांची एकजूट दाखवण्यासाठी आता एकत्र या,एकतेचा संदेश आता सरकारला द्यायचा आहे,दसऱ्याच्या दिवशी ह्या एफआरपीच्या मुद्यावर सरकारशी सीमोल्लंघन करायचे आहे.

यावेळी व्यासपीठावर रवीकांत तुपकर,प्रकाश तात्या बालवडकर,जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे,जिल्हा परिषदचे माजी सभापती दिलीपराव लांडे, सुनील लोंढे,महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 12 Oct 2021 2:26 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top