Home > News Update > रायगड : आश्रमशाळेतील मुलीचा संशयास्पद मृत्यू

रायगड : आश्रमशाळेतील मुलीचा संशयास्पद मृत्यू

रायगड : आश्रमशाळेतील मुलीचा संशयास्पद मृत्यू
X

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरसई आदिवासी आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झालाय. शिल्पा शिद असं तिचं नाव असून तीन १६ वर्षांची होती. दोन दिवसांपासून आदिवासी आश्रमशाळेतून ती बेपत्ता होती. पेण पोलीस ठाण्यात आश्रम शाळेतील प्राचार्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर दुपारीच शिल्पाचा मृतदेह झाडाला फास लावलेल्या अवस्थेत आढळल्याने आदिवासी आश्रमशाळेसह आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ माजली.

हे ही वाचा...

दरम्यान आश्रमशाळेतील सी.सी.टी.व्ही फुटेज पोलिसांनी मिळवले असून त्यात शिल्पा ही जिन्यावरुन उतरून एकटीच कुठेतरी जाताना दिसत आहे. यात ती तिच्या मैत्रिणीला जाऊन येते असा इशारा करताना दिसते आहे. या आधारे आता पुढील तपास केला जातोय. या प्रकरणात प्रकल्प अधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील ३ जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे. पेण उपजिल्हा रुग्णालयात शिल्पाचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे. यातूनच महत्त्वाची माहिती आणि तिच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकणार आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/481726802732591/

Updated : 7 Feb 2020 8:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top