Home > Election 2020 > ‘माझी शेवटची निवडणूक, पवारांची साथ हवी’ : सुशीलकुमार शिंदे

‘माझी शेवटची निवडणूक, पवारांची साथ हवी’ : सुशीलकुमार शिंदे

‘माझी शेवटची निवडणूक, पवारांची साथ हवी’ : सुशीलकुमार शिंदे
X

सोलापूर लोकसभा निवडणूकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. कारण या ठिकाणी दोन दिग्गज नेते निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा सामना होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागले आहे.

त्य़ातच सोलापुरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडी मेळावा नुकताच पार पडला. यावेळी बोलताना सुशिल कुमार शिंदे यांनी पवारांना भावनिक साद घातली.

“शेवटच्या निवडणुकीत शरद पवारांची मला साथ पाहिजे. शरद पवारांनी मला राजकारणात आणलं. मी अनेकवेळा निवडणुका लढविल्या. शरद पवारांची साथ सोडली नाही. मला त्यांचा आशीर्वाद पाहिजे.”, अशी भावनिक साद सुशीलकुमार शिंदे यांनी पवारांनी या निर्धार मेळाव्यात घातली आहे.

सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांचं तिकीट कापले गेले यावरुन शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला. “एखादा खासदार निवडून आला, तर त्याला परत बदलत नाहीत, मात्र सोलापूरमध्ये भाजपने उमेदवार बदलला.” असं म्हणत शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला

दरम्यान या सभेला महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेते उपस्थित असताना माणसांची गर्दी कमी असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र. हा पदाधिकारी मेळावा असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Updated : 3 April 2019 7:09 AM GMT
Next Story
Share it
Top