Home > News Update > #Breaking - अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

#Breaking - अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या

#Breaking - अभिनेता सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या
X

अनेक हिट सिनेमांमध्ये मुख्य भूमिका करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने आत्महत्या केली आहे. वांद्रे इथल्या राहत्या घरी त्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. टीव्ही मालिकेपासून सिनेमांपर्यंत सुशांत सिंह याचा प्रवास होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

चार दिवसांपूर्वी सुशांत सिंहची माजी मॅनेजर दिशा सॅलियन हिने आत्महत्या केली होती. तिने मुंबईतील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सुशांत सिंहने तिच्या कुटुंबाचं सोशल मीडियावरुन सांत्वन केले होते.

धोनी द अनटोल्ड स्टोरी, पीके, छीछोरे, केदारनाथ,काय पो चे यासह अनेक हिट सिनेमांमध्ये त्याने भूमिका साकारल्या होत्या.

Updated : 14 Jun 2020 2:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top