News Update
Home > Election 2020 > सर्वोच्च न्यायालय देणार आज अयोध्या खटल्याचा निकाल

सर्वोच्च न्यायालय देणार आज अयोध्या खटल्याचा निकाल

सर्वोच्च न्यायालय देणार आज अयोध्या खटल्याचा निकाल
X

सर्वोच्च न्यायालय आज अयोध्या खटल्या संर्दभात आपला निकाल देणार आहे. त्यामुळे राम मंदिराकडे जाणारे सर्वे रस्ते बंद करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्ह्यात एक कंट्रोल रुम, अयोध्या तसचं लखनऊ मध्ये हेलीकॉप्टर तयार ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे संपुर्ण राज्यात पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अयोध्या निकालाच्या पार्श्वभुमीवर राज्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील जस्टिस एस ए बोबडे, जस्टिस धनन्जय वाई चन्द्रचूड़ , जस्टिस अशोक भूषण और जस्टिस एस अब्दुल नजीर ही पाच सदस्यीय बेंच आज सकाळी १० वाजता आपला निर्णय देणार आहे. त्यामुळे या महत्त्वपूर्ण निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Updated : 9 Nov 2019 2:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top