Home > News Update > राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, खासदारकी वाचणार

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, खासदारकी वाचणार

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, खासदारकी वाचणार
X

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. ‘मोदी आडनाव’ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिलीय. तर दुसरीकडे त्यांची रद्द झालेली खासदारकी या निर्णयामुळं वाचण्याची शक्यता निर्माण झालीय. गुजरात उच्च न्यायालयानं सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर.गवई, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि प्रशांत कुमार मिश्रा यांच्या पीठानं ही स्थगिती दिलीय. गुजरात न्यायालयानं त्यांच्या निर्णयात राहुल गांधींना जास्तीत-जास्त शिक्षा सुनावण्यामागील कारणं सांगायला हवी होती, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं. राहुल गांधी यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. गुजरात न्यायालयाच्या शिक्षेच्या निर्णयाला राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. तर तक्रारदार पूर्णेश मोदी यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केलाय. युक्तिवादासाठी सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही पक्षांना १५ मिनिटांचा वेळ दिला होता.

Updated : 4 Aug 2023 11:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top