Home > News Update > सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ; नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ; नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ; नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र वैध
X

Navneet Rana and Supreme Cour : अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच निकाल दिला आहे. या प्रकरणातून नवनित राणा यांना दिलासा मिळाला आहे. खासदार नवनीत कौर राणा यांचे 'मोची' जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज आदेश दिले आहेत. राणा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते, या प्रकरणात असे आढळून आले होते की त्यांनी फसवणूक करून 'मोची' जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते, 'शीख-मोची' जातीचे असल्याचे नोंदीवरून दिसून आल्याचं या निकालात सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र 2021 मधे अवैध ठरवलं होतं, त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठाने जात प्रमाण पत्र वैध असल्याचा निर्णय दिला आहे.

जात प्रमाणपत्र प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला आधीच नवनीत राणांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपचे तिकीट मिळाल्यानंतर नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पहिला पक्षप्रवेश मग तिकीट असा प्रकार मात्र नवनीत राणा यांच्याबाबत झाला.

Updated : 4 April 2024 7:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top