Home > News Update > सुपर स्टार अमिताभ बच्चन होणार अयोध्या रामनगरीचे रहिवासी

सुपर स्टार अमिताभ बच्चन होणार अयोध्या रामनगरीचे रहिवासी

सुपर स्टार अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 14.5 कोटींची जमीन घेतली असून त्यावर आलीशान घर बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सुपर स्टार अमिताभ बच्चन होणार अयोध्या रामनगरीचे रहिवासी
X

सुपर स्टार अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत 14.5 कोटींची जमीन घेतली असून त्यावर आलीशान घर बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महानायक अमिताभ बच्चन अयोध्येत बांधणार घर

येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राममंदिराचा उद्घाटन सोहळा. मोदी सरकार कडून श्री रामललाच्या आगमनाच्या तयारी जोरात चालू आहे. देशभरातील अनेक स्टार-सुपरस्टार,राजकारणी, उद्योगपति या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये बॉलिवूडचे बिग बी महानायक अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. मात्र या सोहळ्यापूर्वीच बिग बी यांनी अयोध्येत घर बनवण्यासाठी कोट्यवधी किमतीची जमीन विकत घेतली असून त्यावर आलीशान घर बांधण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्या द्वारे अयोध्येत 7 स्टार एन्क्लेव्ह, द शरयू येथे एक प्लॉट विकत घेतला असून त्याची किंमत 14.5 कोटी रुपये आहे.

प्रकल्प राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर तर विमानतळ 30 मिनिटांवर

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत घर बांधण्यासाठी 14.5 कोटी रुपयांचा जमीन खरेदी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी मुंबई स्थित डेव्हलपर द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या 7-स्टार एन्क्लेव्ह द शरयूमध्ये एक भूखंड खरेदी केला आहे. त्यावर ते 10000 स्क्वेर फूटाचे घर बांधणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकल्पातील आपल्या गुंतवणुकीबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, "अयोध्या हे माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे". दुसरीकडे, एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की शरयूचे “प्रथम नागरिक” म्हणून आम्ही बच्चन यांचे स्वागत करतो. हा प्रकल्प राम मंदिरापासून 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. तर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. या एन्क्लेव्हमध्ये ब्रुकफील्ड ग्रुपचे लीला पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सच्या भागीदारीत एक पंचतारांकित पॅलेस हॉटेल देखील असेल. हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण होणार आहे.

Updated : 15 Jan 2024 9:14 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top