Home > News Update > Sulli deals: साईट निर्माण करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही? प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल.

Sulli deals: साईट निर्माण करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही? प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल.

Sulli deals: साईट निर्माण करणाऱ्यांविरोधात केंद्र सरकार कारवाई का करत नाही? प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल.
X

सुल्ली डील वादानंतर मुस्लिम महिलांना पुन्हा एकदा टार्गेट केलं जात आहे. शनिवारी शेकडो महिलांचे फोटो एका अज्ञात ग्रुप द्वारे Github चा वापर करून बुल्ली बाई नावाच्या अॅपवर अपलोड करण्यात आले आहेत.

यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्याचा म्हटलं आहे. तसेच या संदर्भातील सर्व डिटेल्स महाराष्ट्रातील सायबर टीमला दिल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितला आहे.

सहा महिन्यांपूर्वी सुल्ली डीलचं प्रकरण समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. उत्तर प्रदेशमध्ये आणि दिल्लीमध्ये यासंदर्भात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अशाप्रकारे एका समाजातील महिलांना टार्गेट केले जात असल्याने केंद्र सरकारला पत्र लिहून यासंदर्भात काय कारवाई केली अशी विचारणा केली होती.

केंद्र सरकारने 2 नोव्हेंबर ला प्रियंका चतुर्वेदी यांना या वेबसाइट ब्लॉक केल्याचं सांगितलं होतं. यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी 'फक्त या वेबसाइट ब्लॉक करून चालणार नाही तर या वेबसाईट निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करा' अशी मागणी केली आहे पहा काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी...

Updated : 2 Jan 2022 10:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top