Home > News Update > एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या ही दुर्दैवी बाब - परिवहन मंत्री अनिल परब

एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या ही दुर्दैवी बाब - परिवहन मंत्री अनिल परब

एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या ही दुर्दैवी बाब - परिवहन मंत्री अनिल परब
X

रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून एस.टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या वाढताना दिसत आहेत, या घटना दुर्दैवी असून मी आपल्या माध्यमातून एस. टी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, कोणत्याही समस्येचे उत्तर आत्महत्या नसते असं परिवहन अनिल परब यांनी म्हटले आहे. ते रत्नागिरी येथे माध्यमांशी बोलत होते.

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील दिलीप हरिभाऊ काकडे या 56 वर्षीय एस.टी कर्मचाऱ्यांने एस. टीला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. त्यानंतर माध्यमांनी परिवहन मंत्री परब यांना विचारले असता एस टी कर्मचाऱ्यांनी संप तूर्तास मागे घेतला आहे , एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी माझ बोलणं झालं असून त्यांचे उपोषण थांबवण्याचा मी प्रयत्न केला आहे. तसेच यापुढेही महाराष्ट्र सरकारचे सहकार्य त्यांना राहील. त्यांचा महागाई भत्ता हा थेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने करण्यात आला आहे, त्यांच्या इतरही मागण्यांबाबत परिवहन विभाग सकारात्मक आहे त्यामुळे माझी विनंती आहे की, एस.टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नये. एस. टी पुन्हा रूळावर येणार आहेच तुमच्या मागण्याही मान्य होतील थोडा वेळ द्यावा लागेल इतकंच, आत्महत्या हे कोणत्याही समस्येवरील उत्तर नाही असं परब म्हणाले.

Updated : 29 Oct 2021 12:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top