Home > News Update > सुधींद्र कुलकर्णी यांचा अमित शहांवर घणाघात

सुधींद्र कुलकर्णी यांचा अमित शहांवर घणाघात

सुधींद्र कुलकर्णी यांचा अमित शहांवर घणाघात
X

आता पर्यंत संसदीय इतिहासात एव्हढा खोटारडेपणा कोणी केला नाही. धर्माच्या नावाने कॉंग्रेसने फाळणी केली नाही. भारत हिंदूराष्ट्र झाला तर धोकादायक. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांच्यात पुन्हा फुट पाडून पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी भाजप हे प्रयत्न करत असल्याचा घणाघाती आरोप आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक सुधीन्द्र कुलकर्णी यांनी केला आहे.

या दुरूस्ती विधेयकामुळे आपण आपल्या भारताची गौरवशाली परंपरेला काळीमा फासत आहोत. असा आरोपही त्यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या खास मुलाखतीत दिला.

पाकिस्तानचे शासन एकीकडे पुरोगामीकत्वाकडे वळत आहे. पण आपण मात्र, हिंदू पाकिस्तानकडे चाललो आहोत, असं सांगून आपण सर्व देशभक्तांनी या विधेयकाचा विरोध केला पाहिजे असं ते म्हणाले. या विधेयकात पाकिस्तान, आफगानीस्तान आणि बांगलादेश येथील विस्थापित म्हणजेच ज्यांच्यावर धार्मिक अत्याचार झाले आहेत. त्यांना काही अटीवर भारताचे नागरिकत्व दिलं जाणार आहे.

यात हिंदू, शीख, जैन, बौध्द, ख्रिश्चन अशा नागरिकांचा समावेश आहे. पण यात मुसलमानाचा समावेश नाही. त्यामुळे हिंदू आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण केली जात आहे. यातूनच पुढील निवडणुका जिंकून भारत हिंदू राष्ट्र करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. असं कुलकर्णी म्हणाले.

1947 साली जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारत हिंदू राष्ट्र नव्हते. भारत हिंदू बहुल राष्ट्र होते. त्यावेळी आपल्या घटनेमध्ये सेक्युलर वाक्य नव्हते. पण तरीही 1950 साली घटना स्वीकारताना सर्व घटनाकारांना आणि घटना समितीला माहित होते, की भारत हे सेक्युलर राष्ट्र आहे. म्हणजे हे राष्ट्र कुठल्या एका धर्मायांचे नाही. किंवा कुठल्याही एका धर्माला प्राथमिकता देता येणार नाही अशा प्रकारची भूमिका स्वीकारली.

पण आता जे मोदी सरकार दुरूस्ती विधेयक आणत आहे ते संपूर्ण घटना विरोधी आहे. या विधेयकात आपल्या शेजारच्या देशामध्ये पाकिस्तान, अफगाणीस्तान आणि बांगलादेशातील जे नागरिक धार्मिक अत्याचारामुळे भारतात येतील म्हणजे शरणार्थींना भारताचे नागरिकत्व दिले जाणार आहे. त्यात हिंदू, शीख, बौध्द, ख्रिश्चन आदि धर्मियांचा समावेश आहे. पण जे मुसलमान असतील त्यांना मात्र नागरिकत्व दिले जाणार नाही. म्हणजे या पुढे धर्माच्या नावावर नागरिकत्व दिले जाणार आणि धर्माच्या नावाने मुसलमानांना दुय्यम दर्जा दिला जाणार आहे. आणि हे धोकादायक असल्याचं कुलकर्णी यांनी टू द पॉईंट मध्ये सांगितलं.

आपल्याच बाजूला म्यानमार हा देश आहे तिथे रोहिंग्या मुसलमांनावर धार्मिक अत्याचार होत आहेत. लाखो रोहिंग्या मुसलमान विस्थापित झाला. पण त्यांना नागरिकत्व दिले जाणार नाही. म्हणजे मुसलमान आम्हाला नको सांगणारे हे विधेयक आहे. धार्मिक अत्याचार हे गैर मुसलमान यांच्यामध्येच होत नाही . पाकिस्तानमध्येही मुसलमानावर धार्मिक अत्याचार होतात, तिथं अहमदीया मुसलमान आहे.

त्यांच्यावर मुसलमानाच अत्याचार करतात. तेथील मुसलमान अहमदीयांना मुसलमान मानतच नाही. म्हणजे भेदभावावर आधारीत हे विधेयक आहे. राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व यातील मूलगामी बदल होत आहे. त्यामुळे येत्या काळात मोठा धोका उदभवतो.

गृहमंत्री अमित शहा यांनी कॉग्रेसने धर्माच्या नावावर देशाची फाळणी केली असा जो आरोप केला आहे. तो म्हणजे निव्वळ खोटारडेपणा आहे.

भारताच्या संसदीय इतिहासात एव्हढा खोटारडे पणा कोणत्याही मंत्र्यांने केला नाही. तो अमित शहा करत आहेत. 1947 साली देशाची फाळणी झाली. ही फाळणी कॉग्रेसने केली नाही. कॉग्रेसला ही फाळणी नको होती.

कॉग्रेसने व्दिराष्ट्र विरोधात होते. फाळणी धर्माच्या आधारावर मुस्लीम लीगने मागितली. कॉग्रेसने त्याचा विरोध केला होता. एव्हढंच नाही तर फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान धार्मिक आधारावर तयार झाले पण कॉग्रेसने धर्माच्या आधारवर भारताना हिंदू राष्ट्र घोषित केले नाही.

अमित शहा धांदात खोटं बोलत आहेत. भारताच्या संसदीय इतिहासात इतकं खोटं कोणीही बोलले नाही. असा खुलासा कुलकर्णी विधेयकासंदर्भात सविस्तर माहिती देताना सांगत होते.

महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे प्रबुध्द लोकांचं राज्य आहे. इथं विद्वान आहेत. त्यांनी इतिहास शोधून अमित शहांना बोलवावे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही हे कुठल्या आधारावर बोललात.

कॉग्रेसशी आपण राजकीय विरोध समजू शकतो. पण राजकीय विरोध करत असताना इतिहासाची तोडफोड केली तर चालेल का? असा थेट सवालही त्यांनी अमित शहा यांना केला.

मॅक्स महाराष्ट्रचे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी टू द पॉईँट या विशेष कार्यक्रमात सुधींद्र कुलकर्णी यांनी अनेक मुद्यावर आपली रोखठोक मते मांडली. अमेरिकेने या प्रकरणात तोंड खुपसू नये असंही ते म्हणाले.

संपूर्ण मुलाखत पाहाण्यासाठी आपण मॅक्स महाराष्ट्र युट्युब आणि फेसबुक लॉग करा.

Updated : 11 Dec 2019 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top