Home > News Update > 'माझ्याकडे या मी दोन्हीकडून तुमची 'सेटिंग' करून देतो' ; खासदार सुजय विखेंच्या भाषणाची जोरदार चर्चा

'माझ्याकडे या मी दोन्हीकडून तुमची 'सेटिंग' करून देतो' ; खासदार सुजय विखेंच्या भाषणाची जोरदार चर्चा

माझ्याकडे या मी दोन्हीकडून तुमची सेटिंग करून देतो ; खासदार सुजय विखेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
X

पाथर्डी// विधानपरिषदच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवकांनी टीव्ही बुक केला, कुणी फ्रीज बुक केला, कुणी गाडी बुक केली. मात्र, बातमी आली अहमदनगर 'कॅन्सल', त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये अनेक नगरसेवक दुःखांकीत होऊन बसले, पण त्यांनी माझ्याकडे या मी दोन्हीकडून तुमची 'सेटिंग' करून देतो असं भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी म्हटले. ते पाथर्डी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

दरम्यान खासदार सुजय विखे यांच्या भाषणाची सोशल मीडिया आणि भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे म्हणून संबोधल्या जातात. याच विधानाचा आधार घेत भाजपा खासदार सुजय विखे यांनी पुढे बोलताना म्हटले की, मी मंत्री शब्दाच्या अगोदर मुख्य लावत नाही. कारण, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको, असे म्हटले. सुजय विखे यांच्या या भाषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

सोबतच "लोकं माझ्यावर विश्वास ठेवत नाही , माझं गणित मलाच समजेना लोकं माझ्यावर विश्वास का ठेवत नाही, तुम्हीच सांगा(मोनिका राजळे) की याच्यावर विश्वास ठेवा की, हा टिकेल" असं भाजप खासदार सुजय विखे यांनी म्हणताच एकच हसा पिकला.

Updated : 14 Nov 2021 3:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top