Home > News Update > अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या 'आस्था एक्सप्रेसवर' दगडफेक!

अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या 'आस्था एक्सप्रेसवर' दगडफेक!

अयोध्येच्या दिशेने जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर दगडफेक!
X

Mumbai : सुरतहून अयोध्येच्या (Surat) दिशेने जाणाऱ्या आस्था एक्सप्रेसवर नंदुरबार परिसरात दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाने असा कोणताही प्रकार घडल्याचे नाकारले आहे.

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटनेसंदर्भात तपास सुरू असून त्या ठिकाणी एक मनोरुग्ण आढळून आला आहे. रेल्वे कायद्याच्या कलम १५४ नुसार रेल्वेवर दगडफेक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाचे नाव ईश्वर आणि दुसऱ्याचे नाव रवींद्र असल्याची माहिती मिळत आहे. ईश्वर हा मनोरुग्ण असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रवींद्र याला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस विभागाकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Updated : 16 Feb 2024 3:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top