Home > News Update > आरोग्य विभागाच्या परीक्षा वादात आता बच्चू कडूंची उडी ; MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षा वादात आता बच्चू कडूंची उडी ; MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी

आरोग्य विभागाच्या परीक्षा वादात आता  बच्चू कडूंची उडी ; MPSC मार्फत परीक्षा घेण्याची मागणी
X

आरोग्य विभागाच्या परीक्षेबाबत झालेल्या गोंधळामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे ही परीक्षा पारदर्शीपणे भावी यासाठी ही परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी करत सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आरोग्य विभागातील ५२ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा होत आहे. एकूण ८ लाख परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत. परीक्षा घेण्याचे काम एका खासगी कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. गेल्यावेळी गोंधळ झाल्याने आदल्या दिवशी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २४ ऑक्टोबरला परीक्षा होत आहे. त्यासाठीची प्रवेशपत्र विद्यार्थ्यांना मिळण्यास सुरवात झाली. त्यातून पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या परीक्षेचे दोन सत्रात आयोजन करण्यात आले आहे. मात्र, गोंधळामुळे उमेदवारांना सकाळी एका जिल्ह्यात आणि दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात केंद्र देण्यात आली आहेत. उमेदवारांनी निवडलेली केंद्र न देता दूरचे केंद्र देण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत. त्यावरून सोशल मीडियातूनही रोष व्यक्त केला जात आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने काल यासंबधीचे प्रसिध्दीपत्रक काढून शंकासमाधान करण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनीही आई-वडील पदरमोड करुन मोठ्या आशेने मुलांचा खर्च करतात, पण परीक्षा घेणाऱ्या कंपन्या त्यांच्या भविष्याशी खेळतात, हे योग्य नाही. म्हणून कृपया येत्या काळात सर्व परीक्षा #MPSC मार्फतच घेण्यात याव्यात, ही कळकळीची विनंती सरकारला केली होती.

आरोग्य विभागाचे काम परीक्षेचे काम न्यास या कंपनीला देण्यात आलेला आहे न्यास ही कंपनी ब्लॅक लिस्ट आहे तरीही याच कंपनीला काम का देण्यात आला असा राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्षेप होता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील अशा कंपनीला काम देण्यात येऊ नये व राज्य सरकारने पारदर्शीपणे घ्यावी,ही परिक्षा सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करतात त्यामुळे या परीक्षेत घोळ होऊ नये असे राज्य मंत्री कडू यांनी सांगितलं...

Updated : 18 Oct 2021 11:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top