Home > News Update > स्मार्ट व्हिलेज योजनेला आर. आर पाटील यांचं नाव, आबांच्या पुण्यतिथीला राज्य सरकारची घोषणा

स्मार्ट व्हिलेज योजनेला आर. आर पाटील यांचं नाव, आबांच्या पुण्यतिथीला राज्य सरकारची घोषणा

स्मार्ट व्हिलेज योजनेला आर. आर पाटील यांचं नाव, आबांच्या पुण्यतिथीला राज्य सरकारची घोषणा
X

राज्यातील राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानाच्या ‘स्मार्ट व्हिलेज’ या योजनेचं नाव बदलून ‘स्वर्गीय आर. आर. पाटील स्मार्ट विलेज’ योजना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनी स्वच्छता अभियानाचा बक्षिस वितरण सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातील अंजनी येथे आर. आर. पाटील यांच्या पुण्यतिथी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयंत पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

Updated : 16 Feb 2020 8:54 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top