Home > News Update > मतदान म्हणजे मतदान असतं, Valentine Day निमित्त निवडणूक आयोगाचा उपक्रम

मतदान म्हणजे मतदान असतं, Valentine Day निमित्त निवडणूक आयोगाचा उपक्रम

मतदान म्हणजे मतदान असतं, Valentine Day निमित्त निवडणूक आयोगाचा उपक्रम
X

Valentine's डेचे औचित्य साधत तरुण मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजगृती करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक खास उपक्रम राबवला आहे. मंगेश पाडगावकरांच्या "प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं" या लोकप्रिय कवितेचं साधना गोरे यांनी केलेले विडबंन एका व्हिडिओच्या माध्यमातून तरुणाईला आकर्षित करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. "मतदान म्हणजे मतदान म्हणजे मतदान असतं, तुमच्या - आमच्यासाठी संविधानाचं वरदान असतं!" या ओळींनी कवितेची सुरुवात होते. रेडिओ जॉकी प्रणय जयश्री कैलास चव्हाण या तरुणाने ही कविता सादर केली आहे. प्रेम लोकशाहीवरही करता येतं हा संदेश महाराष्ट्रातील सर्व तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य निवडणूक कार्यालयाने भविष्यातही असे उपक्रम राबण्याचा निर्णय घेतला आहे.


Updated : 15 Feb 2022 8:00 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top