राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाची तारीख ठरली

Courtesy: Social media

राज्यातील कोरोनाचं संकट गंभीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर झाली आहे. ३ ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. “परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला अधिवेशन घेणं शक्य नाही असं लक्षात आलं आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर ३ ऑगस्टला अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पुरवण्या मागण्यांसाठी एक दिवसाचं अधिवेशन घेण्याची शक्यता आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या साथीमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन आधीच गुंडाळण्यात आले होते.