Home > News Update > Munawar Faruqui चा मुंबईत हाऊसफुल शो !

Munawar Faruqui चा मुंबईत हाऊसफुल शो !

Munawar Faruqui चा मुंबईत हाऊसफुल शो !
X

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुखी (munawar faruqui) याचा शो अखेर मुंबईत पार पडला आहे. मुनावरचे तब्बल १२ कार्यक्रम रद्द झाल्यानंतर ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसतर्फे मुंबईत शनिवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. मुंबई पोलिसांनी या कार्यक्रमासाठी कडेकोड बंदोबस्त ठेवला होता. हा कार्यक्रम हाऊसफूल होता आणि अतिशय चांगल्या वातावरणात पार पडल्याची माहिती आयोजक मॅथ्यू एन्थनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या देशात प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, एखाद्या कलाकाराला त्याच्या कलेपासून दूर ठेवता येऊ शकत नाही, त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

स्वत: मुनव्वर फारुखी यानेही आयोजकांसोबतचा फोटो ट्विट केला आहे. तसेच त्याने आपल्या ट्विटमध्ये आयोजक आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत, "लोकशाही आणि एका व्यक्तीच्या हक्कांच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल आभार " असे त्याने म्हटले आहेय

काही महिन्यांपूर्वी मुनव्वर फारुखी याने आपल्या शो दरम्यान हिंदू देव देवतांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचे आरोप करत त्याला इंदूरमध्ये अटक कऱण्यात आली होती. तब्बल एक महिना त्याला तुरुंगात काढावा लागला. त्यानंतरही हिंदुत्ववादी संघटनांनी त्याच्या विविध ठिकाणच्य कार्यक्रमांना विरोध केला होता. यामुळे मुनव्वरचे अनेक शो रद्द करण्यात आले होते. देशभरातील विविध शो रद्द झाल्यानतर मुनव्वरने स्टँड अप कॉमेडी बंद करणार असल्याचे संकेतही दिले होते.

दरम्यान मुनव्वर फारुखीचा शो आता प.बंगालमध्येही होणार आहे. त्याने ट्विट करुन येत्या १६ जानेवारी रोजी आपला कोलकातामध्ये शो असेल अशी माहिती दिली आहे. तसेच मुनव्वर फारुखी आणि कुणाल कामरा यांना आता आंध्र प्रदेशातही शोसाठी निमंत्रण आले आहे. हैदराबादमध्ये या दोघांनी शो केल्यास त्यांचे स्वागत आहे, असे आंध्र प्रदेश सरकारने स्पष्ट केले आहे.

Updated : 19 Dec 2021 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top