Home > News Update > ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक लागणार? ; एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक लागणार? ; एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा

ऐन दिवाळीत लालपरीला ब्रेक लागणार? ; एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा
X

वेळोवेळी सरकारसोबत वाटाघाटी करूनही सरकार एसटी तोट्यात असल्याचे कारण देत एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता,घरभाडे, वेतवाढ देत नाही, त्यामुळे आता एसटी महामंडळाचे राज्यसशानात विलीनीकरण केल्याशिवाय पर्याय नाही, येत्या 30 तारखेपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करून शासनात विलीनीकरण न केल्यास राज्यातील सर्व एसटी कामगार संघटना ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारण्याच्या तयारीत आहे. एक नोव्हेंबर रोजी सदस्यांचे मतदान घेऊन याबाबत पुढील दिशा ठरवली जाईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.महाराष्ट्र एसटी कामगारांचा शेवगाव येथे विभागीय मेळावा पार पडला त्यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कामगार मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप लबडे या पदाधिकाऱ्यांनी हा इशारा दिला. दरम्यान संपाबाबत लोणावळा इथे बैठक घेण्यात एक नोव्हेंबरला मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल. मात्र, आता शासनात विलीनीकरण आणि राज्य शासनाची मुद्रा मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही असा आक्रमक पावित्रा मेळाव्याच्या निमित्ताने घेण्यात आला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कामगार संपावर जाण्याच्या तयारीत असल्याने राज्य सरकार पुढे मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

कोरोना महामारीच्या काळात मुंबई-ठाण्यात सेवा बजावताना 306 एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तसेच आर्थिक विवंचनेतुन 26 कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. अशी बिकट परस्थिती एसटी कर्मचाऱ्यांवर असताना सरकार मात्र, एसटी तोट्यात असल्याचे कारण देत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही. मात्र एसटी तोट्यात असण्याला कर्मचारी नव्हे तर शासनाचे धोरण कारणीभूत आहे असे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मेळाव्यास महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे,शेवंगाव पंचायत समितीचे सभापती क्षितिज घुले, जिल्हा सरचिटणीस दिलीप लबडे, यांच्यासह राज्य आणि जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Updated : 25 Oct 2021 2:39 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top