Home > News Update > एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्टँडवरच मांडला संसार

एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्टँडवरच मांडला संसार

एसटी कर्मचाऱ्यांनी बस स्टँडवरच मांडला संसार
X

राज्य सरकारने पगारवाढीचा प्रस्ताव दिला असला तरी एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एकीकडे काही कर्मचारी कामावर हजर झाले आहेत तर दुसरीकडे अजूनही हजारो कर्मचारी संपावर आहेत. बीडमध्ये तर आता संपकरी कर्मचारी महिलांनी बस स्टँडवरच चूल पेटवून स्वयंपाक सुरु केला आहे. सरकार विलीनकरण करत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा इशाराच या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


Updated : 27 Nov 2021 11:53 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top