Home > News Update > "पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा", एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

"पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा", एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम

पगार वाढीचे गाजर नको, विलीनीकरण करा, एसटी कर्मचारी भूमिकेवर ठाम
X

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संपावर तोडगा म्हणून परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. परंतु आम्हाला पगार वाढ नको, अशी भूमिका संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. विलीनीकरणचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमचा संप असाच सुरू राहील असे नंदुरबार आगारातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. पगार वाढ करून परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना गाजर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्रातील काही संघटनांना हा निर्णय मान्य आहे परंतु राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून हा संप कर्मचाऱ्यांचा आहे, कुठल्या संघटनेचा नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. राज्यातील सर्व कर्मचारी एकत्र असून पगारवाढीचा निर्णय आम्हाला अमान्य असून जोपर्यंत विलिनीकरणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्याचा संप असाच सुरू राहिल असा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Updated : 2021-11-26T10:12:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top