Home > News Update > ST पुन्हा रस्त्यावर येणार?, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

ST पुन्हा रस्त्यावर येणार?, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ST संपामुळे एसटीच्या चाकांना ब्रेक लागला होता. मात्र उच्च न्यायालयाच्या निकालानंतर अखेर ST रस्त्यावर येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

ST पुन्हा रस्त्यावर येणार?, परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
X

कोरोना महामारीपाठोपाठ एसटीचा संप यामुळे एसटीची चाकं थांबली होती. मात्र आता उच्च न्यायालयाच्या निकालानुसार अखेर एसटी कर्मचारी कामावर येण्यास सुरूवात झाल्यामुळे एसटी पुन्हा लोकांच्या सेवेसाठी हजर होणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली. (ST Worker rejoin the service after strike)

उच्च न्यायालयाने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिल, 2022 पर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश दिले आहेत. (High Court Decision on ST strike) त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेली एसटी सेवा पुन्हा पुर्ववत होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनिल परब यांनी एसटी पुन्हा रस्त्याव येणार असल्याचे म्हटले आहे.

यावेळी अनिल परब म्हणाले, संपामुळे गेले 5 महिने एसटीच्या गाड्या उभ्या होत्या. यापैकी काही गाड्या नादुरूस्त असतील त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी लागणार आहे. तसेच कोविड आणि संपामुळे गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत. त्यामुळे कोविडपूर्व काळात जी परिस्थिती होती. त्या परिस्थितीवर मात करीत पुन्हा नव्या दमाने एसटी सुरु करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती दिली.

शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात-(Anil parab on ST worker attack on sharad pawar home)

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर एसटीच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, असे अनिल परब यांनी सांगितले. अनिल परब पुढे म्हणाले या घटनेत गुन्ह्याचे स्वरूप बघून शिस्त व आवेदन पद्धतीनुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना चाप बसेल, असे परब म्हणाले.

Updated : 12 April 2022 2:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top