Home > News Update > एसटीचं खासगीकरण होणार? राज्य सरकारकडून चाचपणी सुरु

एसटीचं खासगीकरण होणार? राज्य सरकारकडून चाचपणी सुरु

एसटीचं खासगीकरण होणार? राज्य सरकारकडून चाचपणी सुरु
X

मुंबई // राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान राज्य सरकारने आवाहन केल्यानंतरही संपकरी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. संपावर तोडगा निघत नसल्याने राज्य सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहेत.

एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने राज्य सरकारने पडताळणी सुरु केल्याची माहिती मिळत आहे. खासगीकरणाच्या बाबतचा अहवाल देण्यासाठी एसटी महामंडळाकडून केपीएमजी संस्थेची नियुक्ती करण्यात आल्याचे वृत्त समोर येत आहे. एकीकडे एसटी महामंडळ तोट्यात आहे, त्यातच तुटपुंजे उत्पन्न आणि खर्च जास्त अशी एसटीची स्थिती आहे.

त्यातच या संपाबाबत प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया येतांना दिसत नाही, त्यामुळे एसटी प्रवाशांना गरज नसल्याचं चित्र दिसत आहे, प्रवाशी खासगी बस प्रवासाचा अवलंब करत आहेत. त्यामुळेच एसटीच्या खासगीकरणाच्या दिशेने सरकारने पहिले पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

काल संध्याकाळी एसटी महामंडळ आणि परिवहन मंत्र्यांची बैठक झाली, या बैठकीत एसटी महामंडाळाचं टप्प्याटप्प्याने खासगीकरण करण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संपावर तोडगा निघाला नाही तर खासगी कंपन्यांना एसटी महामंडळ निमंत्रण देऊ शकतं.

दरम्यान,याबाबत बोलताना माजी मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले की, सरकारने सोडलेली ही केवळ अफवा आहे, कामगारांमध्ये भीतीचं वातावरण तयार व्हावं, खासगीकरण करायला ही काय कोणाची वैयक्तिक शेतमालकी नाही, असं आमदार खोत म्हणाले.

Updated : 19 Nov 2021 2:29 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top