Home > News Update > 10 आणि १२ वीच्या परीक्षांबाबत अखेर सरकारचा निर्णय

10 आणि १२ वीच्या परीक्षांबाबत अखेर सरकारचा निर्णय

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत सरकारने परीक्षा ऑफलाईनच घेण्याचा निर्णय घेतला आहे.

१० वी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या किंवा रद्द करा या मागणीसाठी राज्यभरात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनानंतर या परीक्षांबाबत सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण आता या परीक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. १० वी १२ वीच्या परीक्षा ऑफलाइन होणार आहेत, असा निर्णय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांना जाहीर केला आहे. एवढेच नाही तर ठरलेल्या टाईमटेबल प्रमाणेच ह्या परीक्षा होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले आहे. १०वी ची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान होईल.

दवहावीच्या प्रात्यक्षिक, आणि तोंडी परीक्षा तसेच अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीमध्ये होणार आहे. तर १२वीची लेखी परीक्षा ४ ते ३० मार्च या काळात होईल. तसेच प्रात्यक्षिकांसह तोंडी परीक्षा, आणि अंतर्गत मूल्यमापन १४ ते ३ मार्चदरम्यान होणार आहे. तसेच काही अपरिहार्य कारणामुले या परीक्षा देता आल्या नाही तर विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे.

या निर्णयाबरोबर विद्यारर्थ्यांना एक दिलासा देखील देण्यात आला आहे. ७० ते ८० मार्कांच्या लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तर ४० ते ६० मार्कांच्या पेपरसाठी १५ मिनिटं वाढवण्यात आली आहेत. एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनामुळे परीक्षा देता आली नाही ३१ मार्च ते १८ एप्रिल या कालावधीमध्ये त्याला परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. तसेच विद्यार्थी ज्या शाळा किंवा ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असेल तिथेच त्यांना लेखी परीक्षा देता येणार असल्याची माहितीही गोसावी यांनी दिली आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर किमान एक ते दीड तास आधी उपस्थित राहावं लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Updated : 3 Feb 2022 8:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top