Home > News Update > महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेच्या विशेष गाड्या
X

Nagpur- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) महापरिनिर्वाणदिनानिमित्त (Mahaparinirvana Day) अभिवादन करण्यासाठी रेल्वेच्या विशेष गाड्या मुंबई येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मध्य रेल्वेतर्फे करण्यात आली आहे. रेल्वेकडून १४ अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर, सीएसएमटी-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूरसाठी ६,अजनी ते सीएसएमटी दरम्यान १ रेल्वेगाडी आणि मुंबईसाठी ३ गाड्या चालवण्यात येणार आहे..

विशेष गाड्यांचे वेळापत्रक

नागपूर ते मुंबई- गाडी नंबर ०१२६२ ही रेल्वे नागपूर वरून ४ डिसेंबर ला २३.५५ ला निघेल व सीएसएमटी ला दुसऱ्या दिवशी १५.३० वा. पोहचणार आहे. गडीनंबर ०१२६४ ही रेल्वेगाडी ५ तारखेला नागपूर वरून ०८.०० वाजता निघेल व सीएसएमटी ला त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल. गाडी नंबर ०१२६६ ही रेल्वे ५ डिसेंबर १५.५० वा नागपूर वरून निघेल व मुंबई ला दुसऱ्या ६ डिसेंबर २दिवशी १०.५५ ला पोहोचेल. या रेल्वेगाडीला अजनी, सेवाग्राम, वर्धा, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर येथे थांबे राहतील.

मुंबई-दादर ते सेवाग्राम- अजनी- नागपूर गाडी नंबर ०१२४९ ही रेल्वे ६ डिसेंबर ला १६.४५ वाजता सीएसएमटी वरून सुटेल व अजनी ला दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.३० ला पोहोचेल. तर गाडी नंबर ०१२५१ ही रेल्वे ६ डिसेंबर ला १८.३५ वाजता मुंबई मधून निघेल व सेवाग्राम ला दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० ला पोहोचेल. प्रमाणे गाडी नंबर ०१२५३ ही रेल्वे ७ तारखेला (६ व ७ डिसेंबरच्या मध्यरात्री) दादर मधून रात्री ००.४० वाजता निघेल व अजनीला त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल.

गाडी नंबर ०१२५५ ही रेल्वे ७ तारखेला १२.३५ ला मुंबईवरून निघेल आणि नागपूर ला दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. गाडी नंबर ०१२५७ ही रेल्वे ८ तारखेला १८.३५ वाजता मुंबई मधून सुटेल व नागपूर ला दुसऱ्या दिवशी १२.१० ला पोहोचेल. गाडी नंबर ०१२५९ ही रेल्वे ८ तारखेला (७ व ८ डिसेंबर च्या मध्यरात्री) दादर मधून ००.४० निघेल व अजनी ला त्याच दिवशी १५.५५ वाजता पोहोचेल. ही रेल्वे गाडी दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी ह्या रेल्वे स्टेशन वर थांबे घेणार आहे.

अजनी-मुंबई ही रेल्वे गाडी नंबर ०२०४० ही सुपरफास्ट रेल्वे अजनी वरून ७ डिसेंबर ला १३.३० वा. ला सुटेल व सीएसएमटी ला दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.१० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, दादर ह्या रेल्वे स्थानकावर थांबे घेईल. हा प्रवास करण्या साठी तिकीट घेणे बंधन कारक आहे. आस आव्हाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Updated : 28 Nov 2023 5:38 AM GMT
Next Story
Share it
Top