आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना

लातूर समाजातील सर्व प्रकारच्या जातीभेदाची आणि असमानतेची दरी दूर होऊन समाज एक संघ व्हावा म्हणून मागासवर्गीय व सवर्ण यांच्यातील विवाहा प्रमाणेच मागसवर्गीयांमध्ये विविध प्रवर्गातील आंतरजातीय विवाहांना देखील प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर अंतर्गत “आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना” ही योजना राबवीली जात असून यायोजेने अंतर्गत अंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना रु. 50,000/- प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य दिले जाते.

सदर योजनेचे अर्थ सहाय्य हे 50 टक्के राज्य हिस्सा व 50 टक्के केंद्र हिस्सा या स्वरुपात दिले जाते परंतू केंद्रशासनाच्या तरतूदी अभावी सन 2017-18 ते 2019-20 पर्यंतचे 64 प्रस्ताव निकाली काढणे प्रलंबीत होते. सन 2019-20 च्या आखेरीस केंद्र शासनाची तरतूद प्राप्त झाल्याने समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूरच्या अंतर्गत 64 लाभार्थ्याना लाभ देण्याची प्रकीया चालू आहे.

या प्रस्तावा सोबत विवाह नोंदणी दाखला, विवाहितांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, विवाहीतांचे लग्ना वेळेसचा फोटो, दोन प्रतीष्ठीत व्यक्तीचे योजनेचा लाभ मिळणे बाबत शिफारस पत्र, विवाहीतांचे तहसीलदार यांनी दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र, व विवाहीतांचे एकत्रीत खाते असलेल्या बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेराक्स, देणे आवश्यक आहे.

जाती-भेद, निर्मुलनासाठी आंतर जातीय विवाह हा अत्यंत प्रभावी उपाय असुन आंतरजातीय विवाह केलेल्या सर्व जोडप्यांचे अभिनंदन करून त्यांचे प्रमाणे इतर आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे, समाज कल्याण समिती सभापती रोहीदास वाघमारे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी अवाहन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here