News Update
Home > News Update > आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल: राजेश टोपे आरोग्यमंत्री

आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल: राजेश टोपे आरोग्यमंत्री

आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल:  राजेश टोपे आरोग्यमंत्री
X

कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत दिसत नाही लवकरच आरोग्यभरती करुन राज्याची आरोग्ययंत्रणा सक्षम केली जाईल, असे राजेश टोपे म्हणाले. कुठेही चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही,सध्या छोटी संख्या वाढत आहे. महाराष्ट्राने मोठी रुग्ण संख्या पहिली आहे ,मुंबई, पुणे,नाशिक,ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहेत .

त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली त्यात रुग्ण गंभीर नाही. जरी रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षण असतील असा अनुमान काढता आला आहे. आरोग्य भरती संदर्भात लवकर परीक्षा घेतली जाईल .पोलिसांना सखोल चौकशी करण्यासादर्भत आदेश दिले होते. पोलिसांचा डिटेल अंतिम रिपोर्ट अत्यावश्यक आहे,ड वर्गाचा पेपर तो पूर्ण व्हायरल झाला होता.

त्यामुळे आम्ही पुन्हा 'ड' वर्गाची परीक्षा घेणार,मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा केली. त्यांचं ही मत लक्षात घेतलं आहे,दोन्ही ही परीक्षा लवकर घेण्याचा निर्णय घेऊ,मंत्री मंडळाचा निर्णय आहे. त्याचबरोबर नामांकित संस्थांकडून परीक्षा घेण्याचा देखील निर्णय ह्यात झाला आहे. लवकर परीक्षा होणार पोलीस रिपोर्टमुळे गट क ची परीक्षा रखडली. पुण्यातील किडनी रॅकेट संदर्भात उच्च न्यायालयाने ह्यामध्ये स्थगिती दिली आहे. सस्पेशची कारवाईला स्थगिती दिली आहे,आमच्या कडे त्यांचा सुनावणी सुरू आहे आणखी आठ दिवस लागतील सगळ्या बाजूची माहिती घेऊन योग्य तो निकाल दिला जाईल, गुन्हा दाखल झाला आहे कारवाई होईल.

Updated : 13 May 2022 10:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top