Home > News Update > कोणीतरी माझ्याविरुद्ध विष पेरतंय - एकनाथ खडसे

कोणीतरी माझ्याविरुद्ध विष पेरतंय - एकनाथ खडसे

कोणीतरी माझ्याविरुद्ध विष पेरतंय - एकनाथ खडसे
X

भाजपच्या पहिल्या यादीत नावाचा समावेश नसल्याने भाजप नेते तसच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची राजकीय अस्वस्थता वाढलीय. येत्या ८ दिवसांत काय होतं ते पाहू, तिकीट मिळालं नाही मिळालं तरी तुम्ही मला साथ द्याल का, अशा शब्दात एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा खदखद बाहेर काढलीय. उभं आयुष्य पक्षासाठी खर्ची केलं. मात्र आता आपलं मनात राहील असही खडसे म्हणाले. माझ्या विरोधात कोणीतरी विष पेरतंय आणि ते कोण विष पेरत आहे ते मला माहित असल्याचा संताप खडसेंनी व्यक्त केलाय.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची बहुप्रतिक्षित उमेदवारांची पहिली १२५ उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे नाव भाजपच्या पहिल्या यादीत नाही. गेले ३ वर्षे पक्षांतर्गत बंडखोरीच्या पवित्र्यात असलेल्या खडसे यांना वगळल्यामुळे, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

‘नाथाभाऊ चोर, उचक्का, बदमाश हो गया’

मुख्यमंत्र्यांच्या पीएला तिकीट, खडसेंचं मात्र पहिल्या यादीत नाव नाही

भाजपकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

मुक्ताईनगर मतदारसंघातून १९९० पासून खडसे सलग ६ वेळा निवडून आले आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी पार पाडल्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत ते मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. अशा स्थितीत खडसेंचे नाव पहिल्या यादीत डावलल्यामुळे खडसे अस्वस्थ झालेत. दुसऱ्या यादीची आपल्याला अपेक्षा असल्याचं खडसेंना वाटतंय. ४० वर्ष पक्षासाठी तापश्चर्या केली, मी काय गुन्हा केला याचा मी कायम जाब विचारत राहीन. "यह पब्लिक हें, सब जाणती हें" अस अर्ज भरल्यानंतर खडसेंनी जाहीर भाषणात म्हटलंय.

Updated : 1 Oct 2019 11:17 AM GMT
Next Story
Share it
Top