Home > News Update > किशोरी पेडणेकर नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार सोमय्यांच वक्तव्य

किशोरी पेडणेकर नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार सोमय्यांच वक्तव्य

किशोरी पेडणेकर नंतर आणखी तीन नेते जेलमध्ये जाणार सोमय्यांच वक्तव्य
X

"माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. यावर आता किरीट सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झालेले दिसत आहेत. किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात बॉडी बॅग्ज खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. 500 रुपयांची मृतदेह ठेवण्याची बॉडी बॅग 6700 रुपयांनी घेतली. मुंबईच्या महापौर, अतिरिक्त आयुक्त आणि वेदांत इनोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर लगेच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणालेत की किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि त्या नंतर आणखीन तीन नेते जेलमध्ये जाणार असल्याचं सोमय्या यांनी एका वृत्तवाहीनीला मुलाखत देताना म्हणाले

तर त्यांनी या प्रकरणावर ट्विट करत म्हणाले की "उद्धव ठाकरे सेनेच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी “कोविड कफन मध्ये ही कमाई केली १,५०० रुपयांची बॉडी बॅग (मृतदेह बॅग) ६,७०० मध्ये विकत घेतली वेदांत इन्नोटेक प्रा.लि. कंपनी, महापालिकेचे अधिकारी आणि किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा/FIR दाखल केला असल्याचं माहिती सोमय्या यांनी दिली

Updated : 5 Aug 2023 8:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top