Home > News Update > सोमालियात 26/11 च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे हल्ला, दहशतवाद्यांची हॉटेलमध्ये फायरिंग

सोमालियात 26/11 च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे हल्ला, दहशतवाद्यांची हॉटेलमध्ये फायरिंग

सोमालियात झालेला दहशतवादी हल्ला 26/11 च्या मुंबई हल्ल्यासारखा आहे का? याबरोबरच दहशतवादी संघटना अल शबाब काय आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...

सोमालियात 26/11 च्या मुंबई हल्ल्याप्रमाणे हल्ला, दहशतवाद्यांची हॉटेलमध्ये फायरिंग
X

मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानच्या एका नंबरवरून २६/११ प्रमाणे हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तर दुसरीकडे सोमालियाची राजधानी मोगादिशू येथे शुक्रवारी रात्री 26/11 प्रमाणे दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. दहशतवाद्यांनी हयात हॉटेलमध्ये घुसून गोळीबार केला असून मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 8 जण ठार झाले असून 9 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याअगोदर हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या दोन कारमध्ये स्फोट झाला होता. त्यानंतर दहशतवादी हॉटेलमध्ये घुसले आणि त्यांनी लोकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला.

न्यूज एजेन्सी एएफपीनुसार, हॉटेलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या हल्ल्यात मोगादिशूचे गुप्तचर प्रमुख मुहिद्दीन मोहम्मद जखमी झाले. आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून इस्लामिक दहशतवादी गट अल-शबाबने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

सोमालियामध्ये झालेला हल्ला 26/11 प्रमाणे आहे का?

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतही सोमालिया प्रमाणे हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी मुंबईतील हॉटेल ताज घुसून गोळीबार आणि स्फोट केला होता. या हल्ल्यात 9 हल्लेखोरांसह सुमारे 180 लोक मारले गेले. या हल्ल्यात 10 दहशतवादी 10 एके-47, 10 पिस्तूल, 80 ग्रेनेड, 2,000 गोळ्या, 24 मॅगझिन, 10 मोबाईल फोन, स्फोटके आणि टाइमर बॅगमध्ये घेऊन हॉटेल ताजमध्ये घुसले होते.

अल-शबाब काय आहे?

अल-शबाब ही दहशतवादी संघटना आहे. 2017 मध्ये स्थापन झालेले सोमालिया सरकार उलथून टाकणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

अल-शबाबचा स्थापना 2006 मध्ये झाला. ही संघटना सौदी अरेबियातील वहाबी इस्लामचे पालन करतो.

Updated : 20 Aug 2022 6:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top