Home > News Update > बाप रे बाप ! वर्गात घुसला साप ; सापाला पाहून विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

बाप रे बाप ! वर्गात घुसला साप ; सापाला पाहून विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ

कल्याण येथील शाळेत साप आढळल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बाप रे बाप ! वर्गात घुसला साप ; सापाला पाहून विद्यार्थ्यांची उडाली तारांबळ
X

कल्याण पश्चिममधील (Kalyan West) शशांक विद्यालयात शाळा सुरू असताना अचानक वर्गात साप शिरल्याने विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिम येथील शशांक विद्यालयात वर्ग सुरू होता. त्यावेळी अचानक साप (snake entered in class) वर्गात शिरला.त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांची भीतीने गाळण उडाली. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांनी पुस्तके आणि स्कूल बॅग सोडूनच शाळेच्या बाहेर धूम ठोकली. त्यानंतर शाळेत साप असल्याची माहिती सर्प (snake in school) मित्रांना कळवण्यात आली.

ही माहिती मिळताच सर्प मित्र दत्ता बॉम्बे यांनी घटनास्थळी धाव घेत विद्यार्थ्यांच्या बेंच खाली लपलेल्या सापाला पकडले. साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी (Teachers) सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान शाळेत पकडलेला साप हा बिनविषारी धामण जातीचा असून वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने लगेच त्याला जंगलात सोडले जाणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोबे यांनी सांगितले.

Updated : 15 March 2023 1:11 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top