Home > News Update > मेंढरं सांभाळण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री, मुलगी बेपत्ता

मेंढरं सांभाळण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री, मुलगी बेपत्ता

मेंढरं सांभाळण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीची विक्री, मुलगी बेपत्ता
X

पालघर : कातकरी समाजातील मुलांना मेंढपाळांकडून 2 ते 5 हजारात विकत घेऊन त्यांच्यावर अत्याचार केली असल्याची घटना ताजी आहे. त्यातच आता पालघर जिल्ह्यात असाच प्रकार समोर आला आहे. मेंढरांच्या संगोपनाच्या नावाखाली आठ वर्षाच्या मुलीची पिळवणूक केल्या प्रकरणी मेंढपाळावर वेठबिगारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मेंढपाळांच्या ताब्यात असलेली 6 वर्षाची मुलगी बेपत्ता असल्य

आने खळबळ उडाली आहे. मुंबईला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील धारणहट्टी येथील पाड्यावरची ही घटना आहे.

स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी नरेश भोये यांचे कुटुंब पत्नी कुसुम, मुलगी मनीषा (वय 8 वर्ष) काळू मुलगी (वय 6 वर्ष) यांच्यासह 2019 मध्ये मोलमजुरीच्या कामासाठी मु तळेगाव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील अवि नवल्या यांच्याकडे खडी फोडण्याच्या कामासाठी गेले होते. एक ट्रँक्टर फोडून भरल्यानंतर 400 रुपये मजुरी दिली जात होती. परंतु यामध्ये कुटूंबाची गुजराण होत नव्हती.

यावेळी मेंढपाळ पुंडलिक कादंडकर यांनी या कातकरी कुटूंबाची भेट घेऊन आम्हाला तुझी एक मुलगी मेंढर चारण्यासाठी दे त्या बदल्यात तुला एक मेंढर व 12 हजार रुपये वर्षाचे देतो, असे सांगितले. गरिबीची परिस्थितीती असल्याने वडील नरेश हे तयार झाले आणि मुलगी त्यांच्या ताब्यात दिली आणि 3 वर्षापासून त्यांच्याकडे मेंढर चारणे, शेण काढणे, दूध पाजणे अशी अनेक कामे तिच्याकडून करून घेतली जात होती.

त्याचबरोबर मागील वर्षी दिनांक 28/3/2021 रोजी देवराम कांदडकर व पुंडलिक कांदडकर यांनी या कुटूंबाची भेट घेऊन तुमची लहान मुलगी आमच्या मेंढ्यांची साफसफाई करण्यासाठी द्या त्या बदल्यात वर्षाला 12 हजार आणि एक मेंढर देण्याचे कबूल केले आणि दुसरी मुलगी देखील घेऊन गेले.

परंतु प्रोलोभन दाखवून अज्ञानपणाचा व अल्पवयाचा फायदा घेऊन या कोवळ्या मुलांची प्रचंड पिळवणूक केली असून तसेच केलेल्या कामाचा देखील मोबदला दिला नसल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

अशा परिस्थितीत 17 तारखेला 12 वाजता या मुलीला या मालकांनी शिरपमाळ येथे सोडून पळ काढला. या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेला माहिती मिळताच जव्हार पोलीस ठाणे गाठून वेठबिगारी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा अधिक तपास जव्हारचे पोलीस करत आहेत.

Updated : 20 Sep 2022 1:48 AM GMT
Next Story
Share it
Top